श्रद्धा प्रेम आदर विश्वास या मूलतत्त्वांवर आधारित 'गुरुकुल' विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव सुसज्ज आहे. विविध स्पर्धा आणि उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले 'गुरुकुल' भविष्यात आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आजचे विद्यार्थी भविष्यातील नागरिक आहेत म्हणूनच विद्यार्थी हा गुरुकुलचा केंद्रबिंदू आहे. प्रभू श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हे जसे गुरुकुलात ज्ञानार्जन करून आदर्श ठरले तसे विद्यार्थी घडवण्यासाठी आणि गुरु रवींद्रनाथ टागोर यांना अपेक्षित असलेल्या मुक्त ज्ञानदान पद्धतीचा अवलंब करण्यासाठी व विद्यार्थ्यांना सतत ज्ञानार्थी बनवण्यासाठी गुरुकुल मागील बेचाळीस वर्षे सतत प्रयत्नशील आहे.
treatment
treatment
श्री. उदय व्यंकटेश ठकार
(संस्थापक अध्यक्ष : गुरुकुल परिवार पुणे)
treatment
treatment

गुरुकुलचं कार्य वाळवंटातल्या ओॲसिस सारखं आहे. प्रतिकुलतेतच माणूस कणखर बनतो आणि जीवन प्रवास अधिकाधिक फुलवत जातो. याचे उदाहरण म्हणजे गुरुकुल. उत्तम परंपरा सांभाळण्याचे कार्य गुरुकुल करत आहे. रंगमंचावरील संस्कार सुद्धा गुरुकुलने खूप अचूक घडवले आहेत. सध्याच्या ज्ञानदानाच्या कार्यपद्धती गुरुकुल रोल मॉडेलने शिक्षक घडवण्याचं काम करावं. ही काळाची गरज आहे

महेश सूर्यवंशी
(कोषाध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे)
testimonial quote

संत साहित्य जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देते तसेच संतसाहित्यासारखे महत्त्वपूर्ण कार्य गुरुकुलच्या विविध उपक्रमातून घडत आहे.पुरस्कारांसाठी निवडलेली प्रत्येक व्यक्ती, ही खाणीतून निवडलेल्या हिऱ्यासारख्या आहेत. पुरस्कार विजेत्यांचे कार्य खूप मोठे आहे. मोराला खूप पिसे असतात पण त्यातलं सौंदर्य मोराला स्वतःला पाहता येत नाही. पण गुरुकुलकडे ते पाहण्याची दृष्टी आहे, म्हणूनच समाजातील ही आकर्षक मोरपीस गुरुकुलने या पुरस्कारासाठी निवडली आहेत.

डॉ. भावार्थ देखणे
testimonial quote

श्रद्धेने कार्य करत असताना त्यात प्रेमाचा ओलावा आला की विश्वासाने समाजात आदर निर्माण होतो हा संस्कार गुरुकुलच्या ब्रीदातून दिसून येतो. चौकटीच्या बाहेर कार्य केल्याने विद्यार्थी अधिक प्रगल्भ बनतो आहे हे गुरुकुल ने आपल्या परंपरेतून दाखवून दिले आहे भारतीय संस्कृतीचे कार्य भविष्यात गुरुपदी असेल आणि त्यात गुरुकुलच्या कार्याचा वाटा महत्त्वपूर्ण आहे आणि असेल.

पांडुरंग बलकवडे
(जेष्ठ इतिहास संशोधक)
testimonial quote

गुरुकुलचं सातत्य हे त्यांच्या यशाचे मुख्य कारण आहे. हे सातत्य सद् गुरु गजानन महाराजांच्या आशीर्वादाने इथे घडत आहे .ही प्रत्येक विद्यार्थ्याला खूप आनंदाची आणि जीवनाला दिशा देणारी घटना आहे.

उदय लेले
(संचालक :कॉसमॉस बँक)
testimonial quote

0

Years of Experience

0

Alumni

0

Learners Empowered

0

Annual Activities